"पंचप्राण हरपले"
शेतकऱ्यांचा सूर्य मावळला
      शेतकरीशेतमजूर यांच्या हक्कांसाठी जन्मभर लढलेले शेतकरी संघटनेचे पंचप्राण  शरद जोशी यांचे दिनांक १२ डिसेंबर २०१५ शनिवारी सकाळी ९ वाजता पुण्यातील बोपोडी येथील राहत्या घरी शरद जोशी यांची प्राणज्योत मालवली. ते ८१ वर्षांचे होते.
शरद जोशी यांचा जीवनपट

येथे वाचा.

 ********************
अंत्यसंस्कार

      शेतकरी संघटनेचे नेते माननीय शरद जोशी यांचा पार्थिव देह मंगलवार दिनांक १५/१२/२०१५ रोजी सकाळी ९ वाजे पासून अन्त्य दर्शनासाठी पुणे येथिल डेक्कन जिमखान्याच्या बस स्टैंडच्या मागील नदी पात्रातील मैदानात ठेवण्यात येणार आहे त्या नंतर पुणे हॉस्पिटलच्या पाठीमागील पावनभूमित शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी कृपया करून मंगळवारपर्यंत पुण्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गर्दी करु नये व आपल्या नेत्यांच्या अंतिम दर्शनाच्या वेळी साहेबांना अभिप्रेत असलेल्या नेहमीच्या शिस्तीचे पालन करावे, ही विनंती

: शोकसंदेश :

      शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त झालेले बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाहीअशी दृढ प्रतिज्ञा करून संपूर्ण देशातील शेतीच्या कर्जमुक्तीची स्वप्न बघणारा एक युगपुरूष आज आपल्यापासून काळाने हिरावून घेतला आहे. देशातले संपूर्ण शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त न होताच शेतकरी संघटनेच्या प्रणेत्याला डोळे मिटून घ्यावे लागले, ही बाब अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

     "शेतकरी तितुका एक एक" अशी शिकवण देणार्‍या या शेतकरी नेत्याने शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला आणि शेतकर्‍यांच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करून त्याग करायलाही शिकवले. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने व सुखाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. 

     शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा सूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेवर वाटचाल करून त्यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आता शेतकर्‍यांनी कटीबद्ध झाले पाहिजे. हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.
 - गंगाधर मुटे
महासचिव, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा
शेतकरी तितुका एक एक ....!

शेतकर्‍यांच्या महात्म्याला दंडवत!

Posted by Gangadhar Mute on Tuesday, December 15, 2015

Latest Blog Roll
प्रकाशन दिनांक प्रकार शीर्षक लेखक
25/12/15
वाङ्मयशेती
योद्धा शेतकरी
अखेरची मानवंदना गंगाधर मुटे
18/12/15
काव्यधारा
वाङ्मयशेती
योद्धा शेतकरी
बरं झाल देवा बाप्पा...!! गंगाधर मुटे
13/12/15 योद्धा शेतकरी शेतकऱ्यांचा सूर्य मावळला गंगाधर मुटे
16/12/15
योद्धा शेतकरी
शेतकरी संघटना
VDO
शेतकर्‍यांचा महात्म्याला अखेरचे दंडवत गंगाधर मुटे
13/12/15 योद्धा शेतकरी निवले तुफान आता admin