चारही वक्ते त्यादिवशी जीव ओतून बोलले. माधवराव मोरे आणि प्रल्हाद कराड पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा उत्कटपणे मांडल्या. डॉ. दांडेकर यांनी त्यांच्या वक्तव्याच्या ओघाला शास्त्राच्या बुद्धिनिष्ठतेचा चौथरा देत आपल्या खास शैलीत विचारांची मांडणी केली. त्यानंतर शरद जोशी यांनी डॉ. दांडेकरांच्या भूमिकेचे अवधान ठेवून आपल्या मतांची कौशल्याने उभारणी करीत समारोप केला.

अर्थशास्त्रासंबंधी एका किचकट विषयावरील तीन तासांची चर्चा सभागृहानेही एकतानतेने ऐकली हा अभुतपुर्व प्रसंग होता. या सभेतील विचारांचे संकलन म्हणजेच "शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र : खंडन-मंडन" आदरणीय प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांनी दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने हे पुस्तक डिजिटल आवृत्ती मध्ये उपलब्ध करून दिले आहे.
पुस्तक वाचण्यासाठी येथे किंवा फोटोवर क्लिक करा.